साना सतीश बाबुला अटक

सीबीआय मधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या लाथाळ्या प्रकरणातील कारवाई

नवी दिल्ली – मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्या मनिलॉड्रिंग प्रकरणाच्या संबंधात सक्त वसुली विभागाने आज साना सतीश बाबू या त्याच्या सहकार्याला अटक केली. या आधी सक्त वसुली विभागाकडून त्याचे नाव साक्षीदार म्हणून घेण्यात आले होते. पण ईडीला नव्याने जो काही तपशील हाती लागला आहे त्यानुसार बाबू हाही या प्रकरणात आरोपी असल्याचे लक्षात आल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याचे कुरेशी याच्याशी व्यवहारीक लागेबांधे आहेत. आणि त्याचे काही आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत असे ईडीचे म्हणणे आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोरीच्या प्रकरणातही तो आरोपी आहे. गेल्यावर्षी सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश आस्थाना यांच्या विरूद्ध ज्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता, त्यातील तक्रारदार बाबू हाच होता. याच साऱ्या प्रकरणाच्या तपासावरून आणि लाचखोरीच्या आरोपांवरून सीबीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दुफळी माजली होती.

आपण सीबीआयचे विशेष संचालक राकेश आस्थाना यांना दोन कोटी रूपयांची लाच दिली होती असा बाबुचा दावा होता. त्यावरून सीबीआय तत्कालिन सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांनी आस्थानांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बाबुचा तपास करण्यात वर्मा हेच अडथळा आणीत आहेत असा आरोप आस्थाना यांनी केला होता. त्यामुळे सीबीआयमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांमधील लाथाळ्या उघड झाल्या होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.