फिल्म इंडस्ट्रीला सना खानचा “गुड बाय’

बॉलीवूड स्टार आणि बिग बॉस फेम अभिनेत्री सना खानने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सनाने गुरुवारी रात्री इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने चित्रपटसृष्टीला “गुड बाय’ म्हटले आहे.

सनाने पोस्टमध्ये लिहिले की, आज मी जीवनाच्या एक महत्त्वाच्या निर्णयाबाबत आपल्याशी बोलू इच्छित आहे. मी अनेक वर्षांपासून शोबिजमध्ये (फिल्म इंडस्ट्री) काम करत आहे. या काळात मला प्रसिद्धी आणि पैसाही मिळाला. यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे. परंतु आता मला असे जाणवू लागले आहे की, मानवाने घेतलेला हा जन्म फक्‍त पैसा आणि प्रसिद्धी मिळविणे हाच आहे का?

सना म्हणते, मी जेव्हा या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला जीवनाचा खरा उद्देश समजला आहे. यामुळे मी आज या शो-बिज जीवनाचा अस्वीकार करत मानवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सना खानच्या आधी “दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीमनेही फिल्म इंडस्ट्रीला अलविदा म्हटलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.