ड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी! जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत

सॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने आपल्या बजेट सेगमेंट मध्ये पहिला ‘ड्युअल कॅमेरा’ स्मार्टफोन लाँच केला आहे. सॅमसंगच्या ‘जे’सिरीज मधील हा स्मार्टफोन असून त्याचे नामकरण जे८ असे करण्यात आले आहे.
सॅमसंगच्या या नव्या फोन मध्ये ६” इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला असून डिस्प्लेच्या बेझल्स देखील कमी ठेवण्यात आल्याने हा फोन दिसण्यास आकर्षक आहे. याव्यतिरिक्त ४ जी.बी. रॅम, ६४ जी.बी. इंटरनल मेमोरि, स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर अशी स्पेसिफिकेशन्स देण्यात आली आहेत. फोनमध्ये मागील बाजूस १६ मेगापिक्सेल्स आणि ५ मेगापिक्सेल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले असून त्यामुळे वापरकर्त्यांना डीएसएलआर कॅमेऱ्यांप्रमाणे ‘पोट्रेट’ फोटो काढता येणार आहेत. सॅमसंग ने या फोनमध्ये पुढील बाजूचा कॅमेरा देखील १६ मेगापिक्सेल्सचा दिल्याने हा फोन उत्कृष्ट ‘सेल्फी’ घेऊ शकेल असा अंदाज आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये एमआयने चांगलेच पाय जमवल्याचे चित्र असून मिडरेंजमध्ये एमआयचे फोन्स अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. सॅमसंगने देखील एमआय व इतर चायनीज स्मार्टफोन कंपन्यांच्या पाऊलखुणांवर चालण्याचे ठरवलेले दिसत आहे. तब्ब्ल १९,००० रुपयांमध्ये सॅमसंगने हा फोन उपलब्ध करून दिला असून यामध्ये फीचर्स मात्र भरभरून देण्यात आले आहेत. रेडमी नोट ५ प्रो याफोनला सॅमसंगचा जे८ चांगलीच टक्कर देणार असल्याचे चित्र आहे .
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)