आता डेबिट आणि क्रेडिट कार्डवर असणार ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’; जाणून घ्या

नवी दिल्ली: आजकाल डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जसे तुम्हाला माहित आहेत की, कार्ड पेमेंट खुप सोपे आहे. परंतु बर्‍याचदा विचार केला जातो की कार्ड चोरले किंवा पिन कोणत्या दुसर्‍या व्यक्तीला माहित झाला तर फ्रॉड होण्याची शक्यता असते. मात्र आता डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करणे अधिकच सुरक्षित होणार आहे. कारण, आता तुमचे कार्ड फिंगरप्रिंटने सुसज्ज असणार आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि मास्टर कार्ड दरम्यान करार
दक्षिण कोरिया दिग्गज सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्लोबल पेमेंट दिग्गज मास्टरकार्ड यांच्यात एमओयू एक करार झाला आहे. या दोन कंपनीला फिंगरप्रिंट स्कॅनर असणारे पेमेंट कार्ड लाँच करण्यासाठी मदत करणार आहे.

पिनची नसणार गरज, फिंगरप्रिंटने करता येणार पेमेंट
तुम्ही जर कधी कोणत्याही पीओएसवर जाऊन आपले पेमेंट करत असाल, तर तुम्हाला पिन कार्ड टाकण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही कार्डला फिंगरप्रिंट ऑथिन्टकेशन करून पेमेंट करता येणार आहे. रिपोर्टनुसार फिंगरप्रिंट स्कॅनर असणार्‍या कार्डवर नवीन चिपसेट लावले जाईल, जे की सॅमसंग सिस्टम LSI बिजनेस बनवेल.

वापर करण्यासाठी फिंगरप्रिंट ऑथिन्टकेशनची गरज
या सिस्टीमचा फायदा एक आहे की, जर घरात सर्वांना पिन जरी माहित असला तरी हव ते खरेदी करू शकतात. परंतु या कार्डच्या येण्याने तुम्ही वडिलांचे देखील कार्ड वापरू शकणार नाही. कारण या कार्डचा वापर करण्यासाठी फिंगरप्रिंट ऑथिन्टकेशनची गरज असणार आहे.

सर्वात पहिल्यांदा दक्षिण कोरियात लाँच होणार
या कार्डचे तंत्रज्ञान कोणतेही नवीन नाही. मास्टरकार्डने 2017 मध्ये आपल्या बायोमेट्रिक कार्डसोबत डेमोनेस्ट्रेट केले होते. परंतु हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होवू शकले नाही. सध्या या कंपनीने सॅमसंग सोबत एक डील केली आहे. यासाठी सॅमसंगच्या कंपनीला तंत्रज्ञानाच्या कामात घेतले जाईल. या बायोमेट्रिक कार्डला सर्वात अगोदर दक्षिण कोरियात लाँच केले जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.