सातारा (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील होळ येथील ८४ वर्षीय महिला व तांबवे येथील ९४ वर्षीय पुरुष या दोघांचा गुरुवारी दि. २८ मे रोजी मृत्यू झाला आहे. या दोघांचे करोना संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
काल रात्र उशिरा सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २३ जणांचे घशातील स्त्रावांचा नमुने पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर १७७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही त्यांनी सांगितले.