समीर वानखेडेंचा नोंदवला जवाब; चौकशी पथकापुढे चार तास हजर

मुंबई – क्रुझ ड्रग्ज कारवाई प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा बुधवारी चौकशी पथकाने जवाब नोंदवला. त्यासाठी वानखेडे चौकशी पथकापुढे चार तास हजर राहिले.

वानखेडे यांच्यावरील आरोपांची एनसीबीकडून खातेनिहाय दक्षता चौकशी होणार आहे. त्यासाठी एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक मुंबईत दाखल झाले. त्या पथकासमोर वानखेडे हजर झाले. त्यांनी प्रकरणाशी संबंधित माहिती पथकाला दिली.

त्या पथकाने काही महत्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली. एनसीबीचा पंच प्रभाकर साईल आणि फरार साक्षीदार किरण गोसावी या दोघांनीही चौकशीत सहकार्य करण्याची गरज चौकशी पथकाने अधोरेखित केली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.