मुंबई – एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली असून त्याची एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. त्यातच आता वानखेडे कुटुंबाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे.
याआधी वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ओशिवारा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोप केल्याप्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. ज्ञानदेव वानखेडे यांनी कुटुंबाच्या जातीबाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मलिक यांच्यावर एफआयआर नोंदवावा, अशी वानखेडे कुटुंबीयांची मागणी आहे.
दरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सासरे ज्ञानदेव वानखेडे आणि यास्मिन वानखेडे यांच्यासह राज्यपाल कोश्यारी यांनी भेट घेतली. नवाब मलिकांकडून सातत्याने कुटुंबाची होत असलेली बदनामी थांबावी, या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं समजतं.