जावेद अख्तर यांच्या नंतर गीतकार समीर यांनी ‘पीएम मोदी’ चित्रपटाच्या पोस्टर व्यक्त केले आश्चर्य…

मुंबई – ‘पीएम मोदी’ या चित्रपटावरून निर्माण होणारे वाद थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यानंतर गीतकार समीर यांनी देखील ‘पीएम मोदी’ चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये नाव आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. समीर यांनी आपण या चित्रपटात गीत लिहिले असल्याचा नकार दिला आहे. त्यामुळे एकही गाणे न लिहिता चित्रपटाच्या पोस्टर मध्ये नाव आल्याने जावेद अख्तर यांच्या समवेतच गीतकार समीर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यानंतर आज याचीच पुनरावृत्ती घडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील लोकसभा निवडणुकीत चित्रपट प्रदर्शित झाल्यास आंदोलन करू अशी भूमिका घेतली आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये जावेद अख्तर, समीर आणि प्रसून जोशी अशा तिघांची नावे गीतकार म्हणून लिहिण्यात आलेली आहेत. त्यामुळे काल गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विट करून चित्रपटाच्या पोस्टर मध्ये आपले नाव आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. जावेद अख्तर यांचे हे ट्विट पुन्हा रिट्विट करत कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी खोचक निशाणा साधत आपले मत व्यक्त केले होते.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)