बारामती – शहरामध्ये गांधी चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे व मंडळाचे स्वागत केले. याप्रसंगी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर उभारण्यात आले होते. स्वागत कक्षात उभारलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होती.
स्वागत कक्षामध्ये येणाऱ्या सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. हनुमंत पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे आदींनी स्वागत कक्षाला भेट दिली.
यावेळी दत्तात्रय गावडे, अल्ताफ बागवान, गणेश नवले, ऍड. सुधीर पाटसकर, सतीश घोडके, गणेश वनवे, सोमनाथ मोरे, सुधीर राहतेकर, संदीप अभंग, गणेश कोकरे, आकाश देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.