नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना आज करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे त्यांना गुडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात पात्रा यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले पात्रा हे अनेक टीव्ही चर्चांमध्ये भाजपाची बाजू मांडत असतात. याव्यतिरिक्त संबित पात्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची बाजू मांडत असतात. दरम्यान, करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि तेजिंदर पाल सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली. तसेच त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संबित पात्रा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.