मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे लागेल, संभाजीराजे यांची गर्जना

सातारा- मराठा आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे लागेल अशी गर्जना संभाजीराजे यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

सातारा. कोल्हापूर छत्रपती एकत्र आहेतच मात्र आता सगळ्या महाराष्ट्राला एकत्र येण्याची गरज आहे. अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणून संघटित लढा देण्याचे काम येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल, त्या निर्णयाबरोबर मी असेन, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

दरम्यान, यापुढे मराठा आरक्षणबाबत काय निर्णय सरकार घेईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.