Sambhaji Bhide on Vatsavitri । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत झाले. पुण्यातील अशा उत्साही वातावरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत असतात. यंदाही ते वारीत सहभागी होणार असून संभाजी भिडेही त्यांच्यासोबत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
“वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी,ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये Sambhaji Bhide on Vatsavitri ।
दरम्यान, संभाजी भिडे यांनी पुण्यात आल्यावर जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी धारकऱ्यांशी संवाद साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी,ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनीच पूजेला जावं असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
धारकरी दरवर्षी संचेती हॉस्पिटलच्या पुढे पालखी सोहळयात सहभागी होत असतात. त्याठिकाणी नेहमीच पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदा ही भिडे सोहळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र भिडेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजी भिडे यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी येत असतात त्यांना संबोधित करताना वटपौर्णिमेबाबत भिडे यांनी विधान केलं आहे.
भिडे यांना पोलिसांची नोटीस Sambhaji Bhide on Vatsavitri ।
पुणेपोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या आहेत.यंदा पोलिसांनी आधीच त्यांना नोटीस पाठवली आहे.