उदयनराजेंची नवी गुगली; जलमंदिरात भिडे गुरुजींची राजमातांसोबत खलबते
सातारा – “शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची शुक्रवारी दुपारी जलमंदिरात भेट घेतली. भिडे गुरुजींनी राजमाता कल्पनाराजे व उदयनराजेंशी पावणेदोन तास कमराबंद चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, ही बैठक सुरू असताना उदयनराजे थोडा वेळ “ब्रेक’ घेऊन बाहेर आले. त्यावेळी भाजप प्रवेशाबाबत पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी “मी राजकारणातून अलिप्त राहण्याचा विचार करतोय, अशी गुगली आपल्या नेहमीच्या शैलीत टाकली.
जलमंदिरातील बैठकीत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या संदर्भात भिडे गुरुजींनी त्यांना कोणता कानमंत्र दिला, याची उत्सुकता कायम राहिली आहे. उदयनराजेंनी मात्र पत्रकारांशी बोलताना, “गुरूजी नेहमीच आमच्या घरी येतात,’ असे सांगत या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचा इन्कार केला.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, या घडामोडींची दखल प्रसारमाध्यमांना “जर… तर…’च्या स्वरूपात घ्यावी लागत आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या संभाव्य तारखांचा उदयनराजे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी इन्कार केला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी पडद्याआड चालल्याने जलमंदिरात काय घडतंय, नक्की काय खलबते