पुणे : आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. वटसावित्रीच्या पूजेला महिलांनी कुठला पोशाख घालावा, यावर संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
संभाजी भिडे बोलताना म्हणाले, की वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचा आपला मानस आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी देखील जाऊ नये. या पूजेला साडी नेसलेल्या महिलांनीच जावं, असं विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री : भिडे
तसेच ते पुढे म्हणाले गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे, ह्या व्रताची पथ्य आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा 10 – 10 हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजारांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वतंत्र आहे असेदेखील संभाजी भिडे म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम काय होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.