पुणे – शिरुर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोडा घटनेच्या अनुषंगाने सुरक्षेच्यादृष्टीने समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिकारी आणी बॅकांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम आणी इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बॅंकांच्यावतीने सचिन डोंगरे, रुषभसिंग, राहुल श्रीवास्तव, एस काटकर यांचेसह जवळजवळ 25 ते 30 पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान विष्णु ताम्हाणे व उल्हास कदम यांनी बॅंकेत लावलेले सीसीटीव्ही, नेमण्यात आलेले सिक्युरीटी गार्ड यांचे कर्तव्यबाबत, लॉकर्सची सेफ्टीबाबत घ्यावयाची काळजी व बॅंकेच्या संबंधी ऑनलाईन संदर्भात घडणारे सायबर गुन्ह्यांबाबत उपस्थित बॅंकेचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच पोलीसांनी बॅंकेस भेट दिलेबाबत नोंद करणेसाठी व्हीजीट बुकची व्यवस्था करणेबाबत सांगण्यात आले.
मयुर मायक्रोटेक्नीक्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर दत्तात्रय एकशिंगे यांनी त्यांचे कंपनीकडुन तयार करण्यात आलेले अलार्म व सेन्सर सिस्टीम बाबत प्रात्यक्षिके मार्गदर्शन करत बॅंकेत असलेले सेन्सर व अलार्म सिस्टीम जुने असतील तर अद्ययावत करुन घेणेबाबत अव्हान केले.
सर्व बॅंकांचे पदाधिकारी यांना ग्राहकांना चांगली सेवा देणेबरोबरच काही घटना घडलेस तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधणेबाबतही सांगण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची खबरदारी घेण्याबात मार्गदर्शन करुन पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.