पुणे(प्रतिनिधी) : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीला समर्थ पोलिसांनी जीवदान दिले. तसेच तिच्यावर उपचार करुन तिला निसर्गाच्या सानिध्यात देखील सोडण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, समर्थ पोलीस स्टेशन जवळ टिळक आयुर्वेदिक हॉस्पिटल( रास्ता पेठ, पुणे) येथे एका कुत्र्याने घोरपडीला जखमी केले असल्याचा कॉल डॉक्टर बोरसे यांनी केल्याने सदर ठिकाणी पोलीस शिपाई गणेश शेंडे, सचिन पवार, बाळासाहेब पाटोळे, निलेश साबळे दाखल झाले. त्यांनी पक्षी मित्र रुपेश मायने,विपुल जावळकर, अथर्व केदावकर यांना फोनद्वारे संपर्क करून त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले व जखमी घोरपड हिला ताब्यात घेऊन तिच्यावर औषध उपचार केले. सदर घोरपडीने सदर ठिकाणी अंडे दिले असल्याने तिच्यावर पुन्हा योग्य औषध उपचार करून तिला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.