समता परिषद, रामोशी समाजाचा शिवतारेंना पाठिंबा

अध्यक्ष राऊत यांच्याकडून अधिकृत पत्रक जारी

दिवे- पुरंदर तालुका समता परिषद आणि अखिल भरतीत बेडर रामोशी या संघटनांच्या वतीने पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांना पाठिंबा दिला आहे. पुरंदर तालुका समता परिषदेच्या वतीने अध्यक्ष आबा राऊत यांनी तसे अधिकृत पत्रक जारी केले आहे. रामोशी समाजाच्या वतीने जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्राद्वारे जाहीर केले आहे.

दौलत शितोळे म्हणाले की, रामोशी समाजाला न्याय देण्याचे कार्य महायुतीच्या सरकारने केले आहे. पुरंदर तालुक्‍यात उमाजी नाईक स्मारक आणि परिसरात अनेक विकासकामे राज्यमंत्री शिवतारे आणि तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आबा राऊत म्हणाले की, समता परिषदेचा आपल्याला पाठिंबा असल्याचे कॉंग्रेसकडून खोटे सांगितले जात आहे. समता परिषदेने त्यांना कुठलाही पाठिंबा दिलेला नसून संघटना विजय शिवतारे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.