दाक्षिणात्य स्टार सामंथा अक्केनेनीचे इन्स्टाग्रामवर 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यानिमित्त तिने तिच्या नवीन “1 कोटी मोठ्या कुटुंबाचा’ सन्मान विशेष पद्धतीने साजरा केला आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजीक बांधिलकी जपत तिने 10 स्वयंसेवी संस्था मदत केली आहे. याबाबत सामंथाने इन्स्टाग्रामवर माहिती दिली आणि तिच्या आगामी चित्रपटाचा एक ऑश्य सुद्धा शेअर केला आहे.
फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या 1 कोटी मोठ्या कुटुंबाच्या सन्मानार्थ 10 सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्थांना मदत केली आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.’
अलीकडेच सामंथाने तिचा पती, अभिनेता नागा चैतन्यचा एक फोटो शेअर केला होता. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर चैतन्यचा एक हसतमुख फोटो शेअर केला, त्यामध्ये तो पांढऱ्या रंगाच्या चेक शर्ट आणि ब्राऊन पॅंटमध्ये खूपच हॅंडसम दिसत आहे.
दरम्यान, सामंथाने तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावले आहे. तिने “ये माया चेसावे’, “नीथाने एन पोनवासंथाम’, “ईगा’, “मेर्सल’ आणि “रंगस्थलम’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकरल्या आहेत. तसेच चाहत्यांना आता सामंथाच्या आगामी चित्रपटाबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.