छत्तीसगडमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याची नक्षलवाद्यांकडून हत्या

बिजापुर: छत्तीसगडमध्ये बिजापुर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी तेथे काम करणाऱ्या एका समाजवादी पक्षाच्या नेत्याचे अपहरण करून त्यांची नंतर हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. संतोष पुनेम असे या नेत्याचे नाव आहे. त्यांचे काल मंगळवारी रात्री एका बांधकाम स्थळावरून अपहरण करण्यात आले आज त्यांचा मृतदेहच सापडला.

मरिमल्ल गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पहाणी करण्यासाठी ते तिकडे गेले होते. त्यांच्या हत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. गावकऱ्यांना गावाजवळच्या जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी या विषयी पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुनेम यांनी नुकतीच बिजापुर मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.