भाजपचा पराभव करण्यास ‘सपा-बसपा-आरएलडी’ सक्षम – अखिलेश यादव

नवी दिल्ली – उत्तरप्रेदशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यास समाजवादी-बहुजनसमाज-राष्ट्रीयलोकदल पक्षांचे महागठबंधन सक्षम आहे. काँग्रेस पक्षाने कोणत्याही भ्रमात राहु नये , असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. युतीचे गणित जुळवताना एकमेकांवर टीका करून आपला पक्ष सक्षम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. उत्तरप्रदेशमध्येही काँग्रेसद्वारे सपा-बसपा आघाडीसाठी ७ जागा सोडण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे, या निर्णयामुळेच अखिलेश यादव यांनी काँग्रेसला इशारा देत भाजपाचा पराभव करण्यासा महागळबंधन सक्षम असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान याआधीही अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर अनेकवेळा निशाना साधला आहे. यापूर्वी माध्यमाशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले होते की, आम्हाला राहुल गांधी यांच्या विषयी कमालीचा आदर आहे. पण केवळ उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी निवडणुकीचे जे गणित जमवणे आवश्‍यक होते त्यानुसार आम्ही बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली आहे आणि त्यासाठी कॉंग्रेसला दूर ठेवावे लागले आहे. तथापि निवडणुकीनंतर त्यांच्याशी एकत्र काम करण्यात आम्हाला अडचण नाही असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले होते.

युपीत काँग्रेसने सर्व जागा लढवाव्यात, आमची आघाडी झालेली नाही : मायावती भडकल्या

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)