मोदींची प्रतिक्रीया अवाक करणारी – सॅम पित्रोदा

नवी दिल्ली: पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बालाकोटवर झालेली कारवाई यावरून मी जी प्रतिक्रीया दिली होती त्यावर खुद्द पंतप्रधान मोदींनी दिलेली प्रतिक्रीया पाहून मी अवाक झालो आहे असे इंडियन ओव्हरसिज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे. बालाकोट हल्ल्या विषयी सरकारने अधिक पुरावे जगापुढे आणायला हवेत अशी सुचना त्यांनी आज पुन्हा सरकारला केली असून त्यांनी म्हटले आहे की लोकशाहीत प्रश्‍न विचारले जाणारच. त्यावर चर्चा, संवाद आणि वादविवाद होणे हे कधीही चांगलेच असते. ही चर्चा उपस्थित करणे म्हणजे कोणाच्या हेतुविषयी शंका व्यक्त करणारे नसते असेही त्यांनी म्हटले आहे.

या आधीच्या प्रतिक्रीयेत पित्रोदा यांनी सरकारने बालाकोट हल्ल्याविषयी अधिक तपशीलाने माहिती देणे गरजेचे होते असे म्हटले होते त्यांच्या या प्रतिक्रीयेला मोदींनी आक्षेप घेत विरोधकांवर टीका केली होती व विरोधकांकडून सैन्याचा अवमान केला जात असल्याचे म्हटले होते. त्यावर पित्रोदा यांनी वरील प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला आणखी तपशील द्या एवढेच मला म्हणायचे आहे त्याखेरीज माझे काहीं अधिकचे म्हणणे नाही. त्यावरून इतका गोंधळ का माजवला जातोय असा सवालही त्यांनी केला आहे. केवळ एक प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर त्यावर अशा प्रकारची प्रतिक्रीया थेट पंतप्रधानांकडूनच यावी हे अजब आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मला अधिक पुरावे द्या अशी मी मागणी केली तर चुकले काय असा सवालही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.