टिम मावळ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त रक्तदान शिबिर, चैत्यभूमीला जाण्याकरिता अनुयायांकरिता मोफत बससेवा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
कामशेतमधील शिबिरात 66 जणांचे रक्तदान
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामशेत शहर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने कामशेत येथील गणेश मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रिपाइं युवक पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. समीर जाधव यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये सर्व जाती धर्मातील 66 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी सरपंच नागेश ओव्हाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर अण्णा जाधव, मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सरवते, भाजप युवा अध्यक्ष संदीप काकडे, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस अतुल सोनवणे, भाजपा पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, युवक अध्यक्ष मावळ अंकुश सोनवणे, पुणे जिल्हा संघटक अनिल भांगरे,माजी युवक अध्यक्ष संतोष कदम, मावळ तालुका उपाध्यक्ष अशोक केदारी, सुनील पवार, नितीन ओव्हाळ, विलास सोनवणे, बाबाजी थोरात, तळेगाव शहराध्यक्ष संदीप शिंदे, अभिमन्यू शिंदे, भाजप शहराध्यक्ष मोहन वाघमारे, गजानन शिंदे, सतीश इंगवले फारुखभाई शेख उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे संयोजन कामशेत शहर युवक अध्यक्ष रुपेश गायकवाड, युवक सरचिटणीस कमलेश निकाळजे, युवक कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे, युवक कोषाध्यक्ष दिनेश रोकडे, आकाश ओव्हाळ, संग्राम केदारी यांनी केले मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे गरवारे रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलीत करण्यात आले.
देहूरोडमध्ये आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण
देहूरोड येथील बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड यांनी पुष्पमाला अर्पण केला. अशोक गायकवाड,अशोक सोनवणे,अरुण जगताप,मिना गायकवाड,रंजना सोनवणे, शिवराज वाघमारे, डी. एम. मुखरे, बाबासाहेब गायकवाड आदींनी अभिवादन केले. विविध पक्ष, सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाच्या आवारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ऍड. सदस्य कैलास पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण झेंडे, युवकाध्यक्ष आशिष बंसल, भाजपाचे बाळासाहेब शेलार, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, माजी नगरसेवक,कॉंग्रेस शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, रिपाइंचे अध्यक्ष सुनील गायकवाड, इंद्रपालसिंग रत्तू, शिवसेनेचे रमेश जाधव, विलास हिनकुले, राजेश शेलार, बसपचे प्रविण साखरे, हमीद कुरेशी, चंद्रकांत गायकवाड, मनसेचे मोजेस दास, जॉर्ज दास, भारतीय बौद्ध महासभेचे संजय आगळे, बुद्ध विहार समितीचे सुनील कडलक, संजय ओव्हाळ, पीआरपीचे परशुराम दोडमणी, अरुण जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले.
विकासनगर किवळे येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. देहुरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, राजेंद्र तरस, सुधीर तरस, बापूसाहेब गायकवाड ,राजू येवते, शाम सिंधवाणी, अन्वर शेख, रवींद्र कदम, आंनद रामराजे, अशोक बोधी, सुनील ननवरे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे महामानवास अभिवादन
वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरकचंद रायचंद बाफना अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय (बी.एड. व एम.एड.) व कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य हिरामण लंघे, प्र.प्राचार्य अशोक गायकवाड व ज्येष्ठ प्राध्यापक महादेव सांगळे यांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डी.एड.ची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर अशोक गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.यावेळी संस्थेतील सर्व विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र डोके यांनी केले. मनोज गायकवाड यांनी आभार मानले.
लोणावळा, दि. 6 (वार्ताहर) – येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरण कामात प्रशासन मागील अनेक दिवसांपासून चालढकल करत आहे. लोणावळा शहर शिवसेनेने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला लेखी पत्र देत कामाबाबत पाच सहा दिवसात लेखी माहिती द्या ; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोणावळ्यातील शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणास पुरेसा निधी व सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र तरीदेखील हे गेली अनेक महिन्यांपासून काम सुरू झालेले नाही. निवेदन देतेवेळी वेळी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, युवासेना पुणे जिल्हा चिटणीस शाम उत्तम सुतार, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे आदी उपस्थित होते.
इंदोरीतील विद्यालयात व्याख्यान
इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर व हभप आ. ना. काशीद पाटील जुनिअर कॉलेज प्रशालेत तज्ज्ञ अध्यापक दिलीप हेरोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक सुदाम वाळुंज, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे, शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण मखर, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप पोटे उपस्थित होते. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील गीत गायले. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती गाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सृष्टी गुत्तेदार यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण मखर यांनी मानले.