संगमनेर -सध्याच्या कठीण काळात जिथे आपण सगळीकडे नकारात्मक परिस्थितीचा अनुभव घेत आहोत. त्याच परिस्थितीत संगमनेरमध्ये नुकत्याच चालू झालेल्या बहुराष्ट्रीय साखळी असलेल्या मेडिकव्हर (तांबे) येथे 89 वर्ष वयाच्या आजोबांना नवीन आयुष्य मिळाले.
घसरत जाणारा ऑक्सिजन आणि त्याच बरोबर पूर्वीपासून असलेला मेंदूरोग या परिस्थितीमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला पूर्ण सहकार्याची ग्वाही आणि मग डॉ. सुशांत गिते यांच्या देखरेखीखाली, उपचार सुरू झाले.
औषधे, ऑक्सिजनचा तुडवडा सहन करत सर्व कर्मचाऱ्यांनी जागतिक दर्जाच्या निकषांनुसार उपचार सुरू केले. सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीला आजोबांच्या शरिराने देखील प्रतिसाद दिला.आणि 12 दिवसांच्या ट्रिटमेंटनंतर आजोबांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.
सकारात्मक विचार करण्याची पद्धत नातेवाईकांचे पाठबळ आणि खंबीर मनोवृत्तीमुळे प्रत्येक माणूस करोनावर यशस्वीपणे मात करू शकतो, असेही यावेळी आजोबा म्हणाले. उपचारासाठी डॉ. सुशांत गिते, डॉ. कैलास मांडे, सिस्टर अनिता काटे, सचिन इंगळे, दीपक जाधव, सुमित अहिरराव यांनी विशेष प्रयत्न घेतले.