चिंबळी, (वार्ताहर) – ब्रिटिश सत्तेच्या कर्दनकाळ, बहुजनांच्या कैवारी, सर्वप्रथम स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे महान क्रांतिकारक व प्रति शिवाजी महाराज म्हणून ज्यांच्या गौरव करण्यात आले असे महान आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त निघोजे ग्रामपंचायतीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे, नामदेव सायकर, आनंद भंडलकर, नीलेश मंडले , संतोष गायकवाड आदींसह ग्रामस्थ, समाज बांधव उपस्थित होते.