सई मांजरेकरसोबत सलमानची रोमांटिक पोज

सुपरस्टार सलमान खान हा चित्रपट निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची छोटी मुलगी सईला बॉलीवुडमध्ये लॉन्च करणार आहे. “दबंग-3’मधून सई बॉलिवुडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटात ती सलमान खानच्या प्रेमिकेची भूमिका साकारणार आहे.

सलमान खान सध्या “दबंग-3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तो सतत आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर ऑन-लोकेशन फोओ शेअर करत असतो. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला असून यात त्याच्यासोबत सई मांजरेकर दिसत आहे.

सलमानने हा फोटो शेअर करत “ऑ लोकेशल ञ्चवरलरपसस3 सई मांजरेकर’ अशी फोटो कॅप्शन दिली आहे. या फोटोत सई आणि सलमान दोघेही नदी किनारी रोमांटिक अंदाजात दिसत आहेत. यात सईने पीच कलरचा पंजाबी सूट, तर सलमान ग्रे शर्टमध्ये खूपच हॅंडसम दिसत आहे.

दरम्यान, “दबंग-3’मधून कन्नड स्टार सुदीप मेनस्ट्रीम बॉलिवुडमध्ये पर्दापण करत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सलमान खानच्या पत्नीच्या भूमिकेत पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा काम करणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×