सलमानच्या “दबंग 3’मध्य्‌ साधुंचा डान्स

सलमानच्या “दबंग-3’मधील “मुन्ना बदनाम हुआ’ हे गाणे रिलीज झाले आहे. त्याच्या पूर्वी “हुड हुड दबंग’ हे गाणे देखील रिलीज झाले आहे. मात्र या गाण्यावरून एक नवीन वाद सुरू झाला आहे. या गाण्यामध्ये सलमानबरोबर काही साधूंना डान्स करताना दाखवले गेले आहे. यावर लोकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हे गाणे किंवा गाण्यातील साधूंचा सहभाग वगळला जावा, अशी जोरदार मागणी व्हायला लागली आहे.

एवढेच नव्हे तर या सिनेमावर प्रेक्षकांनी बहिष्कार घालावा, असे आवाहन करणारी ट्विटही पोस्ट व्हायला लागली आहेत. या सगळ्यावर सलमानची प्रतिक्रियाही आली आहे. त्याला या गाण्यामध्ये काहीही आक्षेपार्ह वाटत नाही आहे. मोठ्या सिनेमांबाबत असे वाद होतच असतात. त्यात काहीही नाही, असे तो म्हणाला.

“मुन्ना बदनाम हुआ’ गाण्याच्या लॉंचच्या वेळी त्याने आपल्या सिनेमावर होणारी टीका म्हणजे हा सिनेमा खूप मोठा असल्याची पावती असल्याचे म्हटले आहे. “बजरंगी भाईजान’च्यावेळी सिनेमाच्या नावावरून टीका झाली होती. पण पुढे ही टीका मागे पडली होती. दोन मिनिटे पब्लिसिटी मिळवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून ही टीका असते. त्यात समस्या वाटावी, असे काहीही नाही असेही सलमान म्हणाला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.