क्रिकेट आणि सलमान खानच्या चित्रपटाचे देशामध्ये लाखो चाहते आहेत. परंतु, यंदा सलमान खान आणि क्रिकेट यांची आपापसात टक्कर होणार आहे. सलमान खान आणि कतरीना कैफचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु याच दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये विश्वचषक लढत आहे. यामुळे चाहते कोणाला कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामना दिनी सलमान खान आणि कतरीना कैफ प्री-मॅच शो लाईव्ह होस्ट करणार आहेत. विश्वचषक आणि चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख एकत्र येत असल्याबद्दल निर्माते निखिल नमित म्हणाले कि, भारताचा आणि एवेन्जर्स एंडगेमचा ट्रेलरही एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. तरीही भारताच्या ट्रेलरला चांगले व्ह्यूज मिळाले होते. यावेळीही ही भूमिका हिट होईल अशी आशा आहे.
दरम्यान, ‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे.