‘दंबग 3’ मध्ये मौनी रॉय सोबत आयटम साँग करण्यास ‘सलमान’ इच्छुक

मुंबई – ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. बॉलीवूडमधील चुलबूल पांडे अर्थात सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग-3′ चित्रपटाच्य शूटिंगला प्रारंभ झाला आहे. या चित्रपटात सलमान खान हा ‘मौनी रॉय’ हिच्यासोबत आयटम साँग करण्यास इच्छुक आहे.

चित्रपटाचा निर्माता अरबाज खान हा दबंग-3 मधील आयटम साँगसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. अरबाज खान हा मौनी राॅय आणि सनी लियोनी यांच्यापैकी कोणाला आयटम साँगमध्ये घ्यावे यात गोधंळात पडला आहे. अरबाज खान आणि दिग्दर्शक प्रभुदेवा यांना वाटत की, दबंग-3 या आयटम साँगसाठी सनी लियोनी परफेक्ट ठरेल तर दुसरीकडे मौनी राॅय हिला आयटम साँगमध्ये घेण्यात यावे, अशी सलमानची ईच्छा आहे. या गाण्यात खुद्द सलमानसुध्दा असणार आहे.

यापूर्वी ‘दबंग’ आणि ‘दबंग 2′ प्रमाणे ‘दबंग 3′ मध्येदेखील सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. दंबगच्या पहिल्या भागात मलयका ही ‘मुन्नी बदनाम’ आयटम साँगमध्ये तर दुसऱ्या भागात करिना ‘फेव्हिकोल से’ या आयटम सॉंगमध्ये पाहायला मिळाली होती. हे दोन्हीही आयटम साँग खूप गाजले होते. त्यानंतर आता तिसऱ्या भागात कोण अभिनेत्री आयटम साँग करणार? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.