“दबंग ३”च्या ट्रेलरमुळे सलमान झाला ट्रोल

सलमान खान’चा बहुचर्चित सिनेमा “दबंग ३” प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच “दबंग ३” चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  परंतु ट्रेलर प्रदर्शित होताच सलमान खानला जोरदार ट्रोल करण्यात आले. ट्रोल करण्याचे कारण ऐकल्यास तुम्हालाही धक्का बसेल.

“दबंग ३” चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलरच्या शेवटी सिनेमा प्रदर्शित करण्याची तारीख दिली होती. त्याठिकाणी डिसेंबरची स्पेलिंग चुकीची लिहिली होती.  ‘DECEMBER’ ऐवजी ‘DECEMEBER’ असे लिहिण्यात आली होती. निर्मात्यांच्या या चुकीमुळे ट्रॉलर्सने त्याचे स्क्रीनशॉट काढून ‘सलमान खानला’ टॅग करून याबाबत प्रश्न केले आहेत.

‘इंग्रजी भाषेला माझी श्रद्धांजली’ तर दुसऱ्या एका युजरने “दबंग ३” चित्रपटाची टीम बेजबाबदार आहे, असे लिहिले आहे. रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये ‘सलमान खान’ची भूमिका नेहमीप्रमाणेच असणार आहे. ‘सोनाक्षी सिन्हा’ सुद्धा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेते महेश मांजरेकर’यांची मुलगी ‘सई मांजरेकर’ सुद्धा अभिनय करताना दिसणार आहे.

याआधी सलमान खान’चे तीनही चित्रपट ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ बॉक्स ऑफिसवर काही चांगला कमाल करताना दिसले नाही. त्यामुळे दबंग ३ आत्ता या तीनही चित्रपटांची भरपाई करेल की नाही, हे पाहण्याजोगे ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.