अलिया भट मुळेच सलमानने आपल्याला नाव बदलायला सांगितले होते, असे कियारा आडवाणीने म्हटले आहे. खरे तर कियारा आडवाणीचे खरे नाव आलिया असेच आहे. त्यामुळेच सलमानने नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कारण तोपर्यंत बॉलिवूडमध्ये आलिया भट दाखल झाली होती. बॉलिवूडमध्ये एकाच नावाच्या दोन ऍक्ट्रेस असणे त्रासदायक असू शकते, म्हणून सलमानने हा सल्ला दिला. त्यामुळे आपण कियारा नाव निवडले.
आता कियारा या नावाची इतकी सवय झाली आहे की पालकही याच नावाने हाक मारायला लागले आहेत. “लस्ट स्टोरीज’मधील रोल ऑडिशनशिवाय कसा मिळवला हे देखील कियाराने सांगितले. करण जोहरला त्या रोलसाठी एक हिरोईन हवी होती. त्यानेच आपली निवड केल्याचे कियारा म्हणाली. “लस्ट स्टोरीज’मध्ये एकदा व्हायब्रेटरवरचा एक सीन करत असताना कियाराला करण जोहरनेच अगदी कूल राहण्यास सांगितले होते. कारण हा सीनच थोडा विनोदी होता. जरा जरी वेगळी रिऍक्शन दिली असती, तरी हा विनोदी करण्याचा प्रयत्न केला असता, तर तो अगदी स्वाभाविक विनोदी राहिला नसता, असे कियारा म्हणाली.