मुंबई- बिग बॉस-2 मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही नवीन घडताना पहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचं हे पर्व आता रंगतदार वळणावर आलं असून, या आवठवाड्यातील विकेंडच्या डावात प्रेक्षकांना सलमानची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यावेळी सलमान साताऱ्याचे राजकीय आणि कवी मनाचे नेते ‘अभिजित बिचुकले’ यांची चांगलीच शाळा घेणार आहे.
दरम्यान, यावेळी महेश मांजरेकर घरातील सदस्यांची ओळख सलमानला करून देताना बिचुकलेंची तक्रार त्याच्याकडे करतात. बिचुकलेंबद्दल असलेली तक्रार ऐकल्यानंतर सलमान म्हणतो, ‘हा शो असला तरी हे तुमचं घर आहे…तुम्ही त्या घरातील प्रत्येक काम करायला पाहिजे’. घरातील कामं करण्यास टाळाटाळ केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची प्रतिमा कशी तयार होईल हे देखील सलमान त्यांना समजावून सांगतो.