“राधे’मध्ये सलमान खानच्या ऑपोजिट दिशा पाटनी?

बॉलीवूडमधील चुलबुल पांडे अर्थात सलमान खान पुढील वर्षी ईदनिमित्त दमदार चित्रपट देण्याच्या तयारीत आहे. “दबंग-3’नंतर पुन्हा एकदा प्रभुदेवासोबत तो चित्रपट साकारत आहे. या चित्रपटाचे नाव “राधे ः इंडियाज मोस्ट वॉन्टेड कॉप’ असे आहे. यात सलमानच्या ऑपोजिट अनुष्का शर्माच्या नावाची चर्चा होती. पण आता अभिनेत्री दिशा पाटनीचे समोर येत आहे.

“भारत’नंतर सलमानच्या ऑपोजिट दिशाच्या नाव आघाडीवर असून याबाबत तिच्याशी बोलणी सुरू आहे. याबाबत चित्रपट निर्मात्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. दरम्यान, हा चित्रपट 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या “द आउटलॉज’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे पहिल्या टप्प्यातील शुटिंग मुंबईत करण्यात येणार आहे.

सलमान खान आणि प्रभुदेवा तिस-यांदा एकत्रित काम करणार आहेत. यापूर्वी दोघांनी “वॉन्टेड’ आणि “दबंग-3′ चित्रपटात झळकले होते. यावर्षी डिसेंबरमध्ये “दबंग-3′ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान खानने 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या “तेरे नाम’मध्ये राधेची भूमिका साकारली होती. तसेच 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या “वॉन्टेड’ या ऍक्‍शन चित्रपटातही राधेची भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.