सलमान खानच्या शेराने केली शिवसेनेत एन्ट्री

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागला आहेत. त्यात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यातच बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेरा याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शेराने शुक्रवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवबंधन बांधले.


शिवसनेने त्यांच्या अधिकृत ट्‌विटर अकाऊंटवर शेराने शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेराने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना नेत्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे.

गेल्या 22 वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. शेराला सलमान खानचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखले जातो. आता विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शेरा प्रचारासाठी उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.