-->

श्रीलंका लीगमध्ये सलमान खानची एन्ट्री

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही टी-20 क्रिकेट लीगमधील एक संघ मालक म्हणून एन्ट्री केली आहे. त्याने श्रीलंका प्रीमिअर लीगमधील एक संघ विकत घेतला असून, त्याच्या संघाकडून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल खेळणार आहे.

ही माहिती सलमानचा भाऊ व अभिनेता सोहेल खान याने माध्यमांना दिली आहे. शाहरुख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी या अभिनेते व अभिनेत्रींनी आयपीएलमधील संघ विकत घेतले आहेत.

शाहरुखने तर कॅरेबियन लीगमधीलही एक संघ विकत घेतला आहे. आता याच यादीत सलमाननेही एन्ट्री केली आहे. या संघात गेलसह कुशल परेरा, लियाम प्लंकेट, कुशल मेंडीस व वहाब रियाज यांचा समावेश असून सर्व खेळाडूंची यादी जाहीर केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.