मुंबई – बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान नेहमीच आपल्या लग्नाच्या विषयावरून चर्चेत असतो. सध्या सिंगल आयुष्य जगणाऱ्या सलमानचे नाव अनेक नट्यांसोबत जोडले गेले मात्र लग्न कोणासोबतही होऊ शकले नाही. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री जुही चावला. जुही आणि सलमानच्या लग्नाची जोरदार चर्चा इंडस्ट्रीमध्ये एकेकाळी होती स्वतः सलमानने देखील याबाबत एकदा खुलासा केला होता.
जुही चावलाने अनेक हिट चित्रपट दिले. तसेच इंडस्ट्रीमधील त्यावेळेसच्या सर्वच बड्या कलाकारांसोबत चुहीने स्क्रिन शेअर केली होती. अभिनयाच्या सर्वोच्च शिखरावर असताना चुही चावलाला स्वतः सलमानने प्रपोज केले होते. तो काळ होता १९९५ चा. सलमान देखील त्यावेळी तरुण अभिनेत्यांपैकी एक होता आणि जुही आपल्याला आवडत असलयाचे त्याने अनेकदा सांगितले देखील होते.
एका मीडिया रिपोर्टनुसार सलमानला जुही इतकी पसंद होती की,त्याने तिच्या वडिलांकडे जुहीचा हात मागितला होता. परंतु जुहीच्या वडिलांनी सलमानला नकार दिला होता त्यानंतर जुहीनेही याबाबत विचार करण सोडून दिल होत. एका मुलाखतीत सलमानने स्वतः याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर जुहीने जय मेहतासोबत लग्न केले आणि तब्बल ६ वर्षानंतर जुहीने या लग्नाबाबत खुलासा केला होता.