सलमान खानने माफी मागावी

मुंबई – सलमान खान याचा गोवा आंतराष्ट्रीय विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर झळकत असून या व्हिडिओमध्ये सलमानने त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करत असलेल्या त्याच्या चाहत्याचा मोबाईल अक्षरशः हिसकावून घेतला आहे. मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर सलमान पुढे चालत येताच त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियानं सलमानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियानं सलमानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जो पर्यंत सलमान त्याच्या या वर्तनाबद्दल सार्वजनिक माफी मागत नाही तोपर्यंत त्याला गोव्यात प्रवेश देऊ नये अशी मागणी केली जात आहे. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट अहराज मुल्ला यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांबत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘मी तुम्हाला निवेदन करतो की तुमच्या अथॉरिटीनं या प्रकराणी गंभीर दखल घ्यावी. सलमानकडे माफीची मागणी करावी कारण सार्वजनिक ठिकाणी हा चाहत्याचा अपमान आहे. अशा प्रकारे वाईट रेकॉर्ड असणाऱ्या हिंसक अभिनेत्याला गोव्यात येण्याची परवानगी देऊ नये.’ असं मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.