मुंबई – छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ला लवकरच बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान अलविदा म्हणणार आहे. जवळपास एक दशक सलमान या शोसोबत निगडित आहे. दरवर्षी तो बिग बॉस शो होस्ट करताना दिसतो.
गेले अनेक वर्षे या शो सोबत जोडला गेलेला सलमान यंदा मात्र शोच्या फिनालेच्या आधीच शोमधून रजा घेत आहे. या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात सलमानचा बिग बॉस मधील संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, या शोमुळे सलमानच्या तब्येतीवर परिणाम होत असल्याचं म्हटलं जात आहे. सलमान नुकताच एका आजारातून बरा झाला आहे ज्यामध्ये त्याने फार चिडणं त्याच्या तब्येतीसाठी धोकादायक आहे. असं डॉक्टरांनी म्हंटलं आहे.