Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ हे आज (दि. ५) शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती असणार आहे.
शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड कलाकारांची देखील यावेळी विशेष उपस्थिती असणार आहेत.
बॉलीवुड अभिनेता सलमान खान, सचिन तेंदुलकर, विक्रांत मेसी, जय कोटक, एकता कपूर, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, जानवी कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणबीर कपूर,
रणवीर सिंह, गीतांजलि किर्लोस्कर, बिरेन्द्र सराफ, राजेश अदानी, मनोज सैनिक, KK तातेड़, मृदुला भाटकर, निखिल मेसवानी, हेतल मेसवानी, नीरजा चौधरी, योगेश पुढारी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, एटली, बोनी कपूर, श्रद्धा कपूर, बादशाह, जयेश शाह, जॉन इब्राहिम,
विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, आलोक संघवी, ज्योति पारेख, आलोक कुमार, अरविंकुमार असे अनेक कलाकार या आज शपथविधीला हजेरी लावणार आहेत. तसेच, प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि अनिल अंबानी हे देखील आजच्या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.