मुंबई – राज्याने 10 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केलाय. मात्र राज्यात असे काही भाग आहेत जिथे वेगवेगळ्या गैरसमजांमुळे लोकं करोनाविरोधी लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषत: मुस्लीम बहुसंख्या असणाऱ्या भागांमधील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत.
यासाठीच आता ठाकरे सरकारने नवा प्लॅन आखला आहे. ठाकरे सरकारच्या या प्लॅनमध्ये बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच, अभिनेता ‘सलमान खान’ महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हंटले जात आहे.
सलमानच्या मदतीने मुस्लीम बहुसंख्या परिसरांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती केली जाणार आहे. करोना लसीकरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
Vaccine hesitancy seen in Muslim-dominated areas, govt will rope in actor Salman Khan to promote inoculation: Maharashtra Public Health Minister Rajesh Tope
— Press Trust of India (@PTI_News) November 16, 2021
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल. याशिवाय सलमानप्रमाणे मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अन्य अभिनेत्यांचेही लसीकरणाबाबतचे व्हिडिओ तयार केले जातील. असं देखील राजेश टोपे यावेळी म्हणाले.
जालन्यामध्ये सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे यांनी आपलं मत व्यक्त केलं. धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचं म्हणणं लोक ऐकतील असा विश्वास टोपेंनी व्यक्त केलाय.