मुंबई- बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान सध्या आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर शेतीबाबतचे धडे गिरवतो आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने प्रचंड मी टाईम एन्जॉय केला आहे. लॉकडाऊन असलं तरी देखील त्याने त्याचं आरोग्य उत्तम जोपासलं.
शासनाचे सर्व नियम पाळत त्याने पनवेल येथील फार्म हाऊसवर सुट्टीची मजा लुटली. या कलाकारांचं दैनंदिन आयुष्य एखाद्याने रेखाटलेलं असतं. वेळच्यावेळी गोष्टी कराव्या लागतात. त्या केल्या नाहीतर त्याचा त्यांच्या मानसिक किंवा शारिरीक आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा अनेक सेलिब्रिटीच्या जेवणात विविध भाज्या, सॅलडचा समावेश असतो. जेवताना सगळेच अगदी तोलून मापून जेवतात.
सलमानला भारतीय आणि इटालियन पाककृतींमध्ये नेहमीच कमकुवतपणा होता, परंतु जेव्हापासून मनीष अॅडविलकर यांनी जिम प्रशिक्षकाची भूमिका घेतली तेव्हापासून सलमानच्या डाएट प्लॅनची पूर्णपणे पुनर्रचना केली गेली. मासे, अंडी, मांस आणि दुधाचा आहार असतो.
मात्र सगळं असलं तरी सलमान खानच्या रोजच्या जेवणाचा खर्च किती येत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरंतर सामान्य माणूस फक्त किराण्याचा हिशोब ठेवतो. मात्र सलमानच्या रोजच्या जेवणाचा खर्च एखाद्या माणसाच्या पगारा एवढा आहे. आठ हजार रुपये त्य़ाच्या एका दिवसाच्या जेवणाचा खर्च आहे, असं सांगितलं आहे.