मुंबई – अभिनेता सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार काही दिवसापूर्वी समोर आला होता. त्याअनुषंगाने सलमानने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत पाऊले उचलायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. सलमानने अधिकृतपणे पोलिसांकडे संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यासाठी परवानगी मागितली होती.
नुकतंच सलमान खानने शस्त्र बाळगण्यासाठी परवान्यासाठी अर्ज केला होता. आता त्याला स्वसंरक्षणासाठी बंदूक ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिल्याचे समोर आले आहे. सलमानला आलेल्या धमकीचा गँगस्टर भिष्णोईशी संबंध असल्याचे समोर येताच सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती.
बिश्नोईंची चौकशी
सलमानला धमकीचं पत्र मिळाल्यानंतर दिल्लीतील तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. मात्र बिश्नोईने सलमानला धमकी दिल्याची बाब नाकारली होती. आपल्या नावे कुणीतरी हे धमकीचं पत्र दिल्याचं बिश्नोईने पोलीस चौकशीत सांगितलं.