“मुळशी पॅटर्न’च्या रिमेकमध्ये सलमान खान

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने नुकतेच आपल्या “राधे ः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर सलमान खान याने एक नवीन चित्रपट साइन केला आहे. हा चित्रपट 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या “मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार असून सलमान खानही यात दमदार भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. “मुळशी पॅटर्न’च्या रिमेक हुबेहुब तसाच न करता त्याला भव्यदिव्य पद्धतीने मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर त्याचा मेहुणा आयुष शर्मा हा एका गॅगस्टारची भूमिका साकारेल. या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा 15 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

दरम्यान, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे पोलीस आणि गॅंगस्टार्समधील संघर्ष विस्ताराने दाखविणार आहेत. चित्रपटातील स्पेशल अपियरेंससाठी अनेक ए ग्रेड स्टार्सची यादीही तयार करण्यात आली आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव “गन्स ऑफ नॉर्थ’ असे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु आता ते बदलून अंतिम असे ठेवण्यात आले आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.