Actor Salman Khan | सुपरस्टार सलमान खान लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक अॅटली कुमारच्या अॅक्शन ड्रामामध्ये दिसणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. सलमान व अॅटलीच्या या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे देखील सांगितले जात होते. तसेच, चित्रपटाला सध्या ‘A6’ नाव देण्यात आले होते. परंतु, आता हा अॅक्शन ड्रामा चित्रपट बंद होण्याच्या मार्गावर आहे.
अभिनेता शाहरुख खान हा अॅटलीच्या ‘जवान’ या चित्रपटात दिसला होता. ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. त्यामुळे सलमानचे चाहते आवडत्या अभिनेत्याला अॅटलीच्या नवीन चित्रपटामध्ये पाहण्यास उत्सुक होते.
या मेगा बजेट चित्रपटात अभिनेता रजनीकांत किंवा कमल हासन हे देखील सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्याची शक्यता होती. मात्र, आता हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.
सलमान आणि अॅटलीचा हा चित्रपट आता होणार नाही. वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयश आल्यानंतर अॅटलीने हा निर्णय घेतला आहे. सध्या तो सलमानऐवजी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबतच्या नवीन चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहेत.
‘जवान’नंतर चाहत्यांना सलमानला देखील अशाच अॅक्शन ड्रामामध्ये पाहण्याची इच्छा होती. मात्र, सध्या तरी या चित्रपटावरील काम थांबवण्यात आले आहे. भविष्यात सलमान-अॅटलीची जोडी पुन्हा एखाद्या चित्रपटासाठी एकत्र येऊ शकते.
दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल सांगायचे तर तो सध्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास हे करत आहेत.