जोधपूर – काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खानला काही दिवसांपूर्वी समन्स बजावला असून त्याला आज (1 डिसेंबर) कोर्टात प्रत्यक्षात उपस्थित राहण्यास सांगितले होते. सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती.
मात्र, सलमान आज कोर्टात हजर राहू शकणार नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.
1198 साली हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटींग दरम्यान काळवीट शिकार झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी सलमान खानवर असा आरोप लावण्यात होता की, काकणी गावामध्ये मध्यरात्री सलमानने दोन काळवीटांची शिकार केली होती. हे प्रकरण मागील 20 वर्षांपासून कोर्टात सुरु आहे.