सलमानवर भडक्‍ले फॅन्स

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान अनेकवेळेस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र तरिही त्याचे फॅन्स त्याच्यावरचे प्रेम जराही कमी करत नाहीत. सलमान खानने काहीही केले तरी त्याचे फॅन्स त्याला पाठिशी घालतात.

मात्र आता सलमानचा एक फॅन त्याच्यावर भयंकर नाराज झाला आहे. सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला अहे. हा व्हिडीओ गणपती पूजेच्यावेळचा आहे.

यावेळी सलमान सिगारेट ओढताना दिसतो आहे. सलमानची बहिण अर्पिताने बसवलेल्या गणप्तीच्या पूजेच्यावेळची हा व्हिडीओ शुट केला गेला होता. गणपतीच्या पूजेच्यवेळी सिगरेट ओढण्यावरून सलमानवर त्याचे फॅन नाराज झाले आहेत.

“अरे शर्म करो, भाई’ अशा शब्दांमध्ये एका फॅनने या व्हिडीओवर कॉमेंट केली आहे. इतरही काही जणांनी या व्हिडीओवरून सलमानवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता.

त्यामध्ये सलमान त्याचा भाऊ अरबाझ खानबरोबर मिळून गणपतीची आरती करताना दिसला होता. त्यावर मुस्लिम कट्टरवाद्यांनीही आक्षेप घेतला होता आणि सलमानवर टीका केली होती. सलमानवर पहिल्यांदाच लागोपाठ दोनवेळेस ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×