मुंबई – ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘नयो लगदा’ रिलीज करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नुकताच किसी का भाई किसी की जानचा टीझर रिलीज झाला होता. आता ‘नैयो लगदा’ हे पहिले गाणेही रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान खान पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
टीव्ही शो बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यादरम्यान सलमान खाननेही या खास संध्याकाळचा फायदा घेत किसी का भाई किसी की जानचे पहिले गाणे रिलीज केले. कार्यक्रमातील स्पर्धकांनीही भाईजानसोबत या गाण्यावर मनसोक्त डान्स केल्याचे पाहायला मिळाले. हे गाणे लदाखच्या सुंदर लोकेशनवर शूट करण्यात आले आहे. यामध्ये सलमान आणि पूजा निसर्गाच्या सानिध्यात रोमान्स करताना दिसत आहेत.
‘नैयो लगदा’हे गाणे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले असून याचे लिरिक्स शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. तसेच, पलक मुच्छल यांनी हे गाणे गायले आहे. सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी याचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. यासह सलमानकडे टायगर 3 देखील आहे. टायगर 3 हा टायगर फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे. जो RAW एजंट टायगर आणि ISI एजंट झोया यांच्या पुढे जाईल. टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.