मुंबई – देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये नमाज पठण करत आहेत. दरम्यान, मुस्लिम मान्यतेनुसार हा सण हजरत इब्राहिम यांच्या कुर्बाणीसाठी साजरा करण्यात येतो.
आज या पवित्र प्रसंगी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे. मशिद आणि ईदगाहमध्ये जावून मुस्लिम बांधव नमाज पठण करत आहेत. यातच अभिनेता सलमान खाने फोटो शेअर करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे.
सलमान खान “ईद मुबारक.” इंस्टाग्राम पोस्टवर फॅन्सकडून सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहे. या पोस्टवर लाखोंच्या घरात कमेंटचा वर्षाव होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तो शेतात काम करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे फॅन सलमानचे भरभरून कौतुक करताना दिसून आले.