मेहुण्याचा बचावात ‘असे’ बोलला सलमान…

सलमान खान यांच्या प्रोडक्शन हाऊस मार्फत ‘लावरात्री’ हा नवीन सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. यामध्ये सलमान खानचा मेहुणा आयुष्य शर्मा मुख्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि या चित्रपटाशी संबंधीत कलाकार  दिल्ली येथे उपस्थित होते. तेथे त्यांना पत्रकरांनी प्रश्न विचारला त्यावर सलमान ने आपल्या मेहुण्याचा बचाव करत उत्तर दिले.

सलमान म्हणाला ” हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘भाईभतीजावाद’ काम करत नाही. दर्शक फक्त चांगले कलाकार आणि चित्रपटांचा स्वीकार करतात. ते कोणाचे कोण आहेत याचा फारसा फरक पडत नाही.  आम्ही आयुषला संधी दिली नसती तर अन्य कोणी दिली असती. कारण ते मागील काही वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत होता.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सलमान पुढे म्हाणाला , मला माहिती होते की, ‘भाईभतीजावाद’चा मुद्दा उपस्थीत केला जाईल. आयुष आ एका राजकीय नेत्याचा मुलगा आहे, तृम्ही याचा संबंध ‘भाईभतीजावाद’शी कसा काय लावू शकता.” या चित्रपटाची कथा आयुष्य शर्मा आणि वरिना हुसेन यांच्या प्रेमाभोवती फिरते. जे गुजराती संस्कृतीशी संबंधित आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रसिद्ध गुजराती लेखक निरेन भट्ट यांनी लिहली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)