सलमानला आली लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण

लहान मुलांसाठीच्या एका संगीत स्पर्धेच्या स्पेशल एपिसोडचे शुटिंग सलमानने अलिकडेच केले. त्यामध्ये एका बालगायकाने “साजन’मधील “तुमसे मिलने की तमन्ना है’ हे गाणे म्हटले. त्यावेळी सलमानला त्याचा एकेकाळचा सहकलाकार आणि मित्र लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण आली.

या गाण्यामध्ये सलमान आणि लक्ष्मीकांत बेर्डेने खूप धमाल केली होती. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर सलमानने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यात “मैने प्यार किया’ आणि “हम आपके है कौन’सारख्या गाजलेल्या सिनेमांचीही वर्णी लागते. “तुमसे मिलने की तमन्ना’ या गाण्यामुळे आपल्याला नेहमीच सलमानची आठवण येत राहिल, असे सलमानने सांगितले.

सलमान आणि लक्ष्मीकांत पहिल्यांदा “मैने प्यार किया’मध्ये एकत्र आले होते. त्यावेळी लक्ष्याचा तो पहिलाच हिंदी सिनेमा होता. “मैने प्यार किया’ यशस्वी होण्यासाठी तेही एक महत्वाचे कारण असावे, असे सलमान म्हणाला. आता लक्ष्मीकांत आपल्यामध्ये नाही,. त्याची आठवण मात्र येतच राहणार, असे सलमानने सांगितले. लक्ष्मीकांतच्या आठवणीने सलमानचे डोळे पाणावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.