Salman Khan Skindar Movie | काल २३ मार्च रोजी सलमान खानच्या बहुचर्चित सिंकदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. दिमाखदार ट्रेलर लॅान्च सोहळ्याला सिंकदरची संपूर्ण कास्टने हजरी लावली होती. मीडिया प्रतिनिधींसोबत टीमेने सिनेमाविषयी भरभरून गप्पा मारल्या. मात्र, ट्रेलर लॅान्च सोहळा आपटून सलमान खान एका खास फ्रेन्डसोबत स्पॅाट झाला. दोघांचाही एक व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सिकंदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज सोहळ्याला भाईजानच्या अनोख्या अंदाजाने चाहत्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. या सोहळ्यात सलमान सिंकदरविषयी बोलला. तसेच सिनेमाचे दिग्दर्शकाने सिनेमाची प्रोसेस आणि सिनेमातील इतर कलकारांनी त्यांचा अनुभव सांगितला. या कार्यक्रमानंतर सलमान खान एका खासगी विमानातून मुंबईहून जामनगरला जाताना दिसला.
त्यानंतर जामनगर (गुजरात) येथून सलमानचा व्हिडिओही समोर आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान खानला एक छोटी मुलगी शेक हॅन्ड करायला जवळ जाते, यानंतर तोही तिला शेक हॅन्ड करतो हा आहे तो व्हायरल होणार व्हिडिओ.
सलमानची मैत्रीण
जामनगरमध्ये सलमानला त्याच्या सिंकदर सिनेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण आले होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत जवळची मैत्रीण युलिया वंतूरही दिसत आहे. युलिया अनेकदा सलमान खानच्या फॅमिली फंक्शनला हजेरी लावते. सलमानच्या वाढदिवसालाही ती दिसली होती. सलमानने काही महिन्यांपूर्वी जामनगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला होता.
View this post on Instagram
सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमात रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज आणि किशोर देखील दिसणार आहेत. हे सर्व दक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध कलाकार आहेत. या सिनेमात प्रतीक बब्बर देखील आहे, जो नकारात्मक भूमिकेत दिसणा आहे. सिंकदर ईदच्या शुभमूहर्तावर प्रदर्शित होत आहे.